दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग १०
गौरवीची अवस्था पाहून त्याला तीची किव येते... आणि तीच्या बद्दल मनात तीला जाणून घेण्याची उत्सुकता सुद्धा निर्माण होते...
जेव्हा आरवने तिच्या पोटातून येणाऱ्या टकाटकेचे आवाज ऐकले तेव्हा त्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती...
"ती एवढ्या अवस्थेत एकटी आणि तेही रात्रीची रस्त्यावर कशी राहिली असावी...?" त्याने विचार केला आणि गाडी आपल्या घराच्या दिशेने वळवली...
"चल, आधी माझ्या घरी चल... तुला काहीतरी खायला देईन... इतक्या पावसात उपाशी राहू देणार नाही मी..." आरवने हसत हसत सांगितले...
गौरवीने नकार देण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या भुकेने ती बोलू शकली नाही... तीने फक्त मान डोलावली...
आरवचा अपार्टमेंट मुंबईच्या गर्दीच्या भागात होता...
त्याने गाडी पार्क केली आणि गौरवीला घेऊन तो आत गेला...
घरी पोहोचताच त्याने तिला सोफ्यावर बसायला सांगितले... पण ती पूर्णपणे भिजलेली आणि थरथर कापत तशीच उभी होती...
त्याने गाडी पार्क केली आणि गौरवीला घेऊन तो आत गेला...
घरी पोहोचताच त्याने तिला सोफ्यावर बसायला सांगितले... पण ती पूर्णपणे भिजलेली आणि थरथर कापत तशीच उभी होती...
आरवने ताबडतोब तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्याच डोक्यात एक टपली मारली... आणि तीला सांगितले...,
"आधी तू कपडे बदल... एवढी भिजून चिंब झाली आहेस, आजारी पडशील... आणि मला कामाला लावशील..." असं हसत म्हणत तो पटकन एका बेडरूम मध्ये गेला आणि त्याने एक स्वच्छ टॉवेल आणि आपल्या बहिणीचे सूट-सेट घेऊन आला... ते कपडे थोडे मोठे असले तरी तिच्यावर थोडेफार बसतील...

"हे घे, हे कपडे माझ्या बहिणीचे आहेत... तुला ते होतील... ती थोडी जाड आहे... पण तुला थोडेफार सैल होतील... आणि बाथरूममध्ये जा आणि आधी गरम पाण्याने अंघोळ करून घे... म्हणजे तुला थोडं बरं वाटेल... तोपर्यंत मी तू येईपर्यंत खायला काहीतरी बनवतो..." त्याने हसत हसत सांगितले...
गौरवीने मान खाली घालून त्याच्या हातातील कपडे घेतले आणि बाथरूममध्ये गेली... तीने भिजलेले कपडे काढले आणि मस्त गरम पाण्याने तीने आंघोळ केली आणि स्वतःला स्वच्छ पुसून, आरवच्या बहिणीचे कपडे घातले... ते तिच्यावर थोडे सैल बसले होते, पण तीला मात्र त्या कपड्यात आरामदायक वाटले...
ती शांतपणे बाथरूममधून बाहेर पडली आणि डोळे खाली करून सोफ्यावर बसली... तेवढ्यात आरव स्वयंपाकघरातून गरमागरम इडली-सांबार आणि गरमागरम चहा घेऊन आला...
आणि टेबलावर ठेवले...
आणि टेबलावर ठेवले...
गौरवी मात्र संकोचून बसली होती... तीच्या मनाची होत असलेली घालमेल बघून आरवने प्लेट पुढे सरकवली आणि म्हणाला...
"खा ना, हे तुझ्यासाठीच आहे," गौरवीने संकोचून डोळे खाली केले, पण पोटातील भूक स्वस्थ बसू देईना... इतकी जास्त ती तीव्र झाली होती...
"खा ना, हे तुझ्यासाठीच आहे," गौरवीने संकोचून डोळे खाली केले, पण पोटातील भूक स्वस्थ बसू देईना... इतकी जास्त ती तीव्र झाली होती...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."